राज्यात सायबर सुरकक्षेत वाढ /CYBER CRIME 2023

राज्यात सायबर सुरकक्षेत वाढ cyber crime 2023

 

CYBER गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा CYBER  सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय  आज मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या मंत्रिमंडळ घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक CYBER तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, जेणेकरून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हा उघड करणे व गुन्हा सिद्ध करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल.

CYBER CRIME
CYBER CRIME

 

CYBER CRIME ही जगातील सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून उदयास आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या
समस्येचा मुकाबला करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात सर्वच स्तरावर नागरिकांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून CYBER फसवणुकीच्या प्रकारांनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनही CYBER तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी पद्धतीने नवनवीन प्रकारे गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत आहे.  CYBER CRIME चे गुंतागुंतीचे स्वरूप हाताळण्यात सध्या उपलब्ध असणारी साधने, संसाधने आणि तंत्रज्ञान यांच्यात आमूलाग्र सुधारणा करून आणि अत्याधुनिकता आणून या धोक्याचा प्रभावीपणे सामना करणे आवश्यक झाले आहे. राज्याच्या गृह विभागाने ही गरज ओळखून,CYBER गुन्हेगारीला आळा घालून राज्याला एक CYBER सुरक्षित’ राज्य बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनीयुक्त अशा प्रकल्पाची आखणी केली आहे.

ऑनलाइन फ्रॉड पासून मुक्ती online fraud

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

एकाच छताखाली विविध अद्ययावत साधने आणि तंत्रज्ञान एकत्र आणणार असून यामध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, सर्ट महाराष्ट्र. क्लाऊड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश यामध्ये राहील. लोक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांचा समावेश असलेले अत्याधुनिक नागरिक केंद्रित व्यासपीठ तयार करणार आहे. राज्यभरातील सर्व पोलीस आयुक्त/ अधीक्षक कार्यालयांमधील सर्व CYBER  पोलीस ठाणी या प्रकल्पाशी जोडण्यात येणार असून २४/७ कार्यरत कॉल सेंटरवर दूरध्वनीवरून संपर्क साधून, तसेच मोबाइल अॅपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर CYBER गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदविता येणार आहे.

Leave a comment