दापोली या ठिकाणची पर्यटन स्थळे – Tourist Places in Dapoli

दापोली या ठिकाणची पर्यटन स्थळे – Tourist Places in Dapoli in Marathi

थोडक्यात…

  • मित्रांनो DAPOLI हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
  • DAPOLI हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.
  • ब्रिटिश काळात DAPOLI कॅम्प म्हणूनही दापोली या ठिकाणाला ओळखले जायचे.
  • निसर्गाचे वरदान लाभलेले DAPOLI हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
  • DAPOLI हे ठिकाण समुद्रकिनारे, मासोळी बाजार, ऐतिहासिक गड किल्ले, व नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
  • या ठिकाणी असणाऱ्या सुंदर वातावरणामुळे याला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते..
  • आज आपण या लेखा  मधून DAPOLI या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
  • चला तर मग सुरुवात करूया.
 •  कोलथरे बीच (DAPOLI)

 • कोलथरे बीच हा समुद्रकिनारा DAPOLI या ठिकाणचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
 • समुद्रकिनारा आणि निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण असलेला हा बीच DAPOLI तालुक्यातील कोलथरे या गावामध्ये आहे.
 • कोलथरे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे.
 • या बीचवर मोठ्या प्रमाणात शांतता असल्याने पर्यटन रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी या ठिकाणी येत असतात.
 • कोलथरे बीच वर सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात.
 • DAPOLI पासून हा समुद्रकिनारा 19 किलोमीटर इतकी अंतरावर आहे.
 • उन्हवरे

 • उन्हवरे हे ठिकाण DAPOLI जवळील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
 • या गावाजवळ गंधमिश्रित गरम पाण्याच्या झऱ्यांचे कुंड आहेत.
 • या कुंडात स्नान केल्याने त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात असे म्हटले जाते.
 • हे गरम पाण्याचे झरे सल्फरने समृद्ध असतात.
 • या भागातील व जवळपासच्या गावांमधून लोक गरम पाण्याच्या झऱ्यात स्नान करण्यासाठी येत असतात.
 • दापोली पासून उन्हवरे रे हे ठिकाण 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
 • पन्हाळे काजी लेणी

 • पन्हाळे काजी लेणी ही दापोलीतील पुरातन लेण्या आहेत. पन्हाळी काझी लेणीत साधारणतः 30 बौद्ध लेणी आहेत.
 • या लेणी समूहामध्ये गणपती, त्रिपुरसुंदरी, सरस्वती यांच्या देखील मुर्त्या कोरलेल्या आहेत.
 • हीनयानपंताने इसवी सन तिसऱ्या शतकामध्ये ही लेणी कोरण्यास सुरुवात केली.
 •  दापोली – दाभिळ – पांगरी मार्गाने पन्हाळकाजी लेणी पर्यंत पोहोचता येते.
 • हा रस्ता खराब असला तरी तो लेण्यापर्यंत जातो.
 • पन्हाळे काजी लेणी ही जंगल आणि नदीने वेढलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात.
 • परशुराम भूमी

 • परशुराम भूमी हे ठिकाण निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली एक सुंदर टेकडी आहे.
 • संपूर्ण कोकण भूमी ही भगवान परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे.
 • या ठिकाणी  20 फूट उंच असलेल्या पृथ्वीच्या अर्ध्या भागावर भगवान परशुरामाची 21 फूट उंच मूर्ती स्थापित केलेली आहे.
 • भगवान परशुरामाची ही मूर्ती या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
 • त्याचबरोबर जवळपासचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देखील हे एक सर्वोत्तम ठिकाण आह%8