ऑनलाइन फ्रॉड पासून मुक्ती online fraud

ऑनलाइन फ्रॉड पासून मुक्ती online fraud

online fraud
online fraud

 

जमाना ऑनलाइनचा आहे. खरेदी विक्री, पैशांची देवाणघेवाण आदींसह अनेक कामे ऑनलाइन होतात. अनेकदा नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती नसते, मग online    fraud  ला बळी पडतात .आधार, पॅन कार्ड द्यावा की नाही, हेही ठाऊक नसते. पिन नंबर देणे आणि क्यूआर कोड स्कॅन करणे हे किती धोक्याचे असते हेही अनेकांना ठाऊक नसते. या सर्व गोष्टी लक्षात येईपर्यंत चोरट्याने तुमचे बँक खाते रिकामी केलेले असते. टेक्नॉलॉजी आपलीशी करताना अमृत काळात डिजिटल शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर काम करावे लागलणार आहे.

फिशिंग लिंक पाठवून लुबाडणूक

केव्हायसी अपडेट किंवा अन्य कारणांसाठी लिक पाठवून फसवणूक. लिकवर क्लिक करताच पैसे गायब. युजर नेम, पासवर्ड, ओटीपी द्या, आम्ही माहिती भरून देतो असे सांगून फसवणूक.

काय काळजी घ्यावी : माहित नसलेल्या व्यक्तीकडून केव्हायसी अपडेटसाठी फोन बँकेला कळवा. बँकेकडून याची खातरजमा करून घ्या. खातरजमा केल्याशिवाय माहित नसलेल्या क्रमांक किवा मेलवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.

ऑफरच्या नावे लुबाडणूक

‘बँकेची विमा काढण्याची ऑफर आहे, तुमचे नाव, जन्मतारीख, पद, कंपनी सर्व तपशिल आमच्याकडे आहे, तुम्ही नाही म्हणालात तर ती पॉलिसी डिअॅक्टिव्हेट केली जाईल.’ असा फोन येतो. माणूनस हमखास फसतोच. ओटीपीसह सर्व काही सांगून टाकतो.

काय काळजी घ्यावी : असा फोन येताच कोणतीही माहिती देण्याआधी प्रथम बँक मॅनेजरला फोन करा. ओटीपी कुणाला देवू नका. बँक कधीही अशी माहिती फोनवर मागत नाही.

ऑनलाइन विक्रीतून गंडा

सोशल मीडियावर एखादी वस्तू विकण्याची जाहिरात करतात फोन नंबरही देतात. कुणी पसंत करताच पैसा पाठवण्यासाठी लिंक पाठवून अखेर पेमेंटसाठी पिन नंबर मागितला जातो.

काय काळजी घ्यावी : यूपीआय पिन हा केवळ पेमेंट करताना लागतो, पेमेंट स्वीकारताना नाही, हे कायम लक्षात ठेवा.

क्रेडिट कार्ड फी माफी

क्रेडिट कार्डाचे वार्षिक शुल्क किंवा इतर शुल्क माफ करण्यासाठी फोन येतो. पेमेंट करुन देतो अशी बतावणी करून पिन नंबर मागितला जातो. परंतु प्रत्यक्षात तुमचे पैसे काढले जातात.

काय काळजी घ्यावी: तुमच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक अमका आहे का, अशी विचारणा कुणी करताच त्याचवेळी सावध व्हा.

एटीएम कार्ड स्कीमिंग

एटीएममध्ये मशीनला स्किमिंग डिव्हाइस लावलेली असते. कार्ड टाकताच ही डिव्हाइस तुमच्या कार्डचा नंबर, पिन नंबर आदी माहिती टिपून घेते. या माहितीच्या आधारे बनावट कार्ड बनवून तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात.

काय काळजी घ्यावी : एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्याआधी तिथे स्किमिंग डिव्हाइस तर लावलेली नाही ना, याची खात्री करून घ्या. अनेकांना हे एटीएम मशिनचाच भाग आहे असे वाटते.

सिम कार्ड क्लोनिंगने खाते साफ

इंटरनेटचा स्पीड वाढवा, सिम अपग्रेड करा आदी ऑफर्सचे फोन येतात. यासाठी आधार कार्ड क्रमांक व २० अंकी सिम कार्ड क्रमांक मागितला जातो. चोरटे सिमचे क्लोनिंग करून बँकिंगसाठी लागणारा युजर आयडी पासवर्ड मिळवतात.

काय काळजी घ्यावी : सिमकार्डबाबत अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका. तुमचा आधार क्रमांक तसेच सिम कार्ड क्रमांक कधीही अनोळखी कॉलरला शेअर करू नका.

क्यू आर कोडने पैशांचा अपहार

तुम्हाला आवडलेली वस्तू घेताना पेमेंटसाठी चोरटे एक क्यूआर कोड मेलवर पाठवतात. तो स्कॅन करताच यूपीआय पिन क्रमांक विचारला जातो. तो टाईप करताच लुबाडणूक झाल्याचे लक्षात येते.

काय काळजी घ्यावी: क्यू आर कोड वापरण्याआधी नेहमी तो कशासाठी आहे, याची माहिती घ्या. पैसे घेण्यासाठी कधीही क्यूआर कोड स्कॅन करू नका. हा कोड केवळ पैसे भरण्यासाठी स्कॅन करावा लागतो, घेण्यासाठी नव्हे हे लक्षात ठेवा.

सोशल मीडियातील तोतयागिरी

अचानक कुणी परिचित आजारी पडल्याची बतावणी करून १० हजार रुपयांची मागणी केली जाते. तुम्ही त्याला पैसे पाठवूनही देता. खूप दिवसांनी त्या व्यक्तीची भेट झाल्यानंतर समजते की, ती व्यक्ती आजारी नव्हती, आलेला फोन खरा नव्हता.

काय काळजी घ्यावी : सोशल मीडियामध्ये केवळ पोस्ट पाहून कृती करू नका. त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोला किंवा भेटून खात्री करून घ्या. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

चार्जिंग केबलने डेटा चोरी

सार्वजनिक ठिकाण, रेल्वे स्टेशन, बसस्टॉप आदी ठिकाणी स्मार्टफोन चार्जिंग केल्यानंतर काही दिवसांनी लक्षात येते की तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली आहे. ती चार्जिंग नव्हे डेटा केबल असते. ज्याने तुमची माहिती चोरली गेलेली असते.

काय काळजी घ्यावी: अनोळखी वा नवक्या ठिकाणी फोन चार्जिंग करू नका. अनोळखी व्यक्तीकडून घेतलेल्या चार्जिंग केबलने फोन चार्ज करू नका.

लॉटरी लागल्याची बतावणी

तुम्हाला परदेशी टूरवर जाण्याचे बक्षिस, १० लाखांचा जॅकपॉट किवा लॉटरी लागला आहे, तातडीने दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असे मेसेज येतात. नोंदणीसाठी किवा टॅक्ससाठी काही पैसे आधी मागितले जाते.

काय काळजी घ्यावी: अनोळखी वक्तीकडून आलेला मेसेज किंवा कॉलची तसेच त्याच्या कंपनीची आधी खातरजमा करून घ्या. लॉटरीच्या बाबतीत नेहमी अधिकृत वेबसाइटवरून माहिती मिळवा. मोठ्या रकमेच्या आमिषाने कुणालाही खातरजमा न करता कधीही पैसे पाठवू नका.

जॉब ऑफरचा बहाणा

कुण्या कंपनीच्या एचआर विभागाचा अधिकारी भासवून जॉब ऑफर सांगण्यासाठी चोरटे फोन करतात. लॅपटॉपच्या डिपॉझिटपोटी फक्त ५ हजार भरण्यास सांगितले जाते. नंतर तो नंबर बंद होतो, कुणीही तुम्हाला फोन करीत नाही, ना नोकरी दिली जाते.

काय काळजी घ्यावी : नोकरीसाठी कधीही कोणालाही पैसे पाठवू नका. कोणताही अधिकृत कंपनी जॉब ऑफर लेटर किंवा नोकरीच्या बदल्यात पैशांची मागणी करीत नाही.

कर्ज देण्याची बतावणी

फायनान्स कंपनीचा एक्झिक्युटिव्ह म्हणून चोरटे फोन करतात. स्वस्त दरात कर्ज मंजूर झाल्याची बतावणी करतात. तुमची सर्व कागदपत्रे आणि कॅन्सल चेक घेऊन जातात. नंतर या आधारे बँकेचे कर्ज उचलले जाते जे चोराने लंपास केलेले असते.

काय काळजी घ्यावी : कोणत्याही व्यवहारात कागदपत्रे कुठे पाठविली जात आहेत, यावर देखरेख ठेवा. तुमचा आधार व पॅन क्रमांक, बँक खात्याचा तपशिल, चेक कधीही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.

लसीकरणाचे आमिष

हेल्थ सेंटरकडून मोफत लसीकरणासाठी बोगस फोन केला जातो. यासाठी तुमचा आधार आणि पॅन क्रमांक घेतला जातो. रजिस्ट्रेशनसाठी लिंक पाठवून ओटीपी मागवला जातो, परंतु या माहितीआधारे चोरटे तुमच्या नावे लाखोंचे कर्ज काढून मोकळे होतात.

काय काळजी घ्यावी: पॅन-आधार यांच्याशी संबंधित येणारे ओटीपी बऱ्याचदा बँकेतून पैसे काढण्यासाठी वापरले जातात, हे लक्षात ठेवा.

लोन रिकव्हरी एजंट बनून चोरी

तुम्ही थकविलेले कर्ज वसुलीसाठी बँकेचा प्रतिनिधी म्हणून चोरटे घरी येतात. काही रकमेच्या मोबदल्यात सेटलेमंट करण्याचे आश्वासन देतात. पण कोणताही पावती ने देता चोरटे रक्कम घेऊन पोबारा करतात.

काय काळजी घ्यावी : पेमेंट करण्याआधी रिकव्हरी एजंटला दिलेले आयकार्ड व रिकव्हरी नोटिसीच्या पत्राची खात्री करून घ्या. एजंटला कधीही खातरजमा केल्याखेरीज तसेत पावतीशिवाय रोखीने पैसे देऊ नका.

चेन मार्केटिंगमधून झटपट पैसे

कमी पैसे गुंतवून व कमी वेळात श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणारे अनेक जण फिरत असतात. यात सुरुवातीला कंपनीची २० हजारांची उत्पादने घेण्यास भाग पाडले जाते. हे घेताच १० हजारांचा मोबाइल गिफ्ट म्हणून दिला जातो. नंतर या योजनेत आणखी तिघांना सामावून घ्यायचे. प्रत्येकामागे ३ हजारांचे कमिशन मिळते. याला भुलून तुम्ही २० हजारांची खरेदी करून योजनेत सामील होता. पण लक्षात येते की कुणी नवीन सदस्य मिळत नाही, उत्पादनेही विकली न गेल्याने टार्गेटही पूर्ण होत नाही. तुमची फसवणूक झालेली असते.

काय काळजी घ्यावी : अशा फसव्या योजनांपासून दूर राहा. अशा प्रकारच्या पाँझी योजनांवर भारतात कायद्याने बंदी आहे, हे लक्षात ठेवा. कुणी मित्र वा ओळखीचा अशा योजनेत येण्यासाठी आग्रह धरून बसला असेल तर त्याला नम्रपणे नकार कळवा.

अनुदानाच्या आमिषाने लुबाडणूक

कृषी खात्यातून बोलत असल्याची बतावणी करीत अचानक फोन येतो, किसान योजनेत तुमच्या खात्याचा तपशिल अपडेट न केल्याने तुम्हाला द्यायचे १२ हजार तसेच पडून आहेत, असे सांगितले जाते. तुम्ही विचारता अपडेटसाठी काय करावे लागेल? ती व्यक्ती सांगते वेबसाईटवर जाऊन अपडेट करा किंवा आम्हाला सांगा, आम्ही करू. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून बँक खाते व कार्डाचा नंबर देऊन टाकता. आलेला ओटीपी तो तुमच्याकडून न विसरता मागून घेतो. पण काही मिनिटातच तुमचे खाते साफ केले जाते.

काय काळजी घ्यावी : सरकारी अनुदान किंवा कोणत्याही योजनेसंबंधी काहीही करण्याआधी ग्रामपंचायत, तहसिलदार किंवा संबंधित कार्यालयातून खातरजमा करून घ्यावी. पात्र व्यक्तींची माहिती सरकारकडे आधीपासून असते. तहसिलदार कार्यालयातल लोकसेवा केंद्रात नोंदणी केल्यानंतर याचे लाभ तुम्हाला दिले जातात, हे लक्षात ठेवा.

ऑनलाइन सट्ट्याच्या जाळ्यात

कमी वेळात अधिक पैसा कमावण्यासाठी अनेक जण सट्टा लावतात. ऑनलाइन वेबसाइटवर लॉग इन करताच स्वागताचा मेसेज येतो. सट्टा लावण्यासाठी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल, त्यासाठी फक्त ५ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले जाते. मोबदल्यात ५ हजारांचा कॅशबॅक मिळेल जो तुमच्या वॉलेटमध्ये जमा होईल, असे सांगितले जाते. तुम्ही ५ हजार रुपये भरून वाट पाहता, परंतु ना तुमच्या वॉलेटमध्ये काही जमा होते ना तुम्हाला कुणाचा मेसेज येतो.

काय काळजी घ्यावी: अनोळखी वेबसाईटवर कधीही कुठलेली पेमेंट करू नका.

मेसेज अॅपद्वारे पैशांची लुबाडणूक

ऑनलाइन खरेदी असो वा बँकिंग सर्व कामे हल्ली मोबाइलवर होतात. यासाठी काही अॅप विकसित केलेले असतात. चोरटे बँकांच्या नावे मदतीच्या बहाण्याने किंवा एखाद्या सेवेसाठी फोन करतात. तुमचा विश्वास संपादन करून अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. लिकवर आधार, पॅन, बँक खाते आदी तपशिल भरुन घेतात. अॅपक्टिव्हेशनसाठी यूपीआय पिन नंबर मागून घेतला जातो. थोड्यात वेळात खात्यातून २० हजार काढल्याचा मेसेज येतो. संशय येताच त्या नंबरवर फोन केला असता तो बंद लागतो.

काय काळजी घ्यावी: अनोळखी नंबरवरून बँक खात्याचा तपशिल मागण्यासाठी आलेल्या कॉलवर बोलताना काळजी घ्या. सोप्या बँकिंग सर्व्हिॲपच्या नावे आलेल्या अनोळखी फोनवर विश्वास ठेवू नका.

फेक विमा पॉलिसीची विक्रीची

आरोग्य विमा किंवा फॅमिलीसाठी मेडिक्लेम पॉलिसी हे विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचे. एकदा रस्त्यावर विमा कंपनीचे स्टॉल दिसते. ऑफर असल्याने तिथे मोठी गर्दीही असते. चौकशी केली असता समजते फॅमिलीसाठी ४ लाखांचा कव्हर आहे, प्रीमियम १० हजार रुपये आहे. आजच पॉलिसी घेतल्यास ५० टक्के सवलत मिळणार आहे. घरच्यांशी सल्लामसलत न करता तुम्ही पॉलिसी घेऊन टाकता. दिलेल्या खात्यावर पैसे भरून टाकता. पॉलिसी सर्टिफिकेट सात दिवसात घरी पाठवले जाईल, असे सांगितले जाते. परंतु पुढे काहीही होत नाही. शोधाशोध केली असता कंपनीचा स्टॉल गायब झालेला दिसतो. तुम्हाला चोरट्यांनी फसवलेले असते.

काय काळजी घ्यावी : पॉलिसी घेण्याआधी योजना व कंपनीची खातरजमा करा. पॉलिसी नेहमी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातूनच घ्या. कंपनीच्या खात्याची खातरजमा केल्याखेरीज अनोळखी खात्यावर पेमेंट करू नका.

Leave a comment